लॉयड मेटल्स इन्फिनिटी फॉउंडेशनतर्फे विश्व स्वच्छता दिन साजरा

15

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लॉयड मेटल्स इन्फिनिटी फॉउंडेशनमार्फत विश्व स्वच्छता दिनानिमित्त माइनिंग परिसरातील हेडरी, बांडे व नेंडर गावात कंपनीतील कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या वतीने गाव स्वच्छ अभियान राबविण्यात आले. गावातील ओला कचरा व सुखा कचरा कसे विलेवाट लावायचे यासाठी गाव परिसातील नागरिकांना जागृत केले. तसेच कचऱ्यामुळे होणारी रोगराई कशी टाळायची यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी लॉयड मेटल्स अँड एनर्जी व इन्फिनिटी फॉउंडेशनचे पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.