– विजय गोरडवार यांच्या हस्ते बालगोपालांना शालेय साहित्यांची भेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मागील चार दशकांपासून हनुमान मंदिर वॉर्ड क्रमांक 23 येथील हनुमान मंदिर परिसरात दरवर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. तीच परंपरा जोपासून यंदाही फार मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. परिसरातील बालगोपाल, त्यांचे आईवडील आपआपल्या मुलांना वेशभूषा करून मोठ्या संख्येने उपस्थित झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपालांना तान्हा पोळ्याच्या औचित्यावर नगर परिषद माजी सभापती तथा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय गोरडवार यांच्या हस्ते शालेय साहित्यांची भेट देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, सामाजिक कार्यकर्ते भास्कर निमजे, माजी नगरसेविका मिनल चिमूरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक दलीतमित्र नानाजी वाढई महाराज, अशोक आक्केवार, निखिल चरडे, नवनाथ वाढई, स्वप्नील भांडेकर, उज्वला भांडेकर, नितीन रोहनकर, साजेश चंदनखेडे, संदीप बंडीवार, मनोहर दंडीकवार, सोमाजी भोयर, सुरेश भोयर, अमोल दासरवार, लक्ष्मण बावणे, रुपेश आनंदपवार, रामभाऊ चापले, राहुल अलोने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रकाश कंपलवार, मुकेश मेश्राम, निकेश कांबळे, प्रमोद भोयर, विष्णू वासेकर, योगेश वाळके, रुपेश दंडीकवार, अविनाश कंपलवार आदींनी परिश्रम घेतले.