पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा

28
Nete-Waghare-
Nete-Waghare-

– खासदार अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांची माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 16 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला असून या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती खासदार अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी दिली आहे.

खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी भाजपा पदाधिकारी यांना सेवा पंधरवड्यात युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रमही होणार आहेत. आयुष्यमान सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले ९ वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी म्हटले आहे.

रविवार, 17 सप्टेंबर दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत ‘धन्यवाद मोदीजी’ लाभार्थी संमेलन मंडलस्थानी घ्यावीत. यामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. संमेलनाचे फोटो (माहितीसह) bjpmaha@gmail.com / Whatsapp- 9321425742 व सरल अ‍ॅपवर पाठवा व सेवा पंधरवडा उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन खासदार अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.