लांजेडा येथे बालगोपालांसह तान्हा पोळा उत्साहात साजरा

24

– भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 16 सप्टेंबर : शहरातील लांजेडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बालगोपालनसह नंदीबैल सजवून एकत्रित आणून बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. भाजपा लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व भाजपा महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे यांनी नंदीबैलाचे निरीक्षण करून विजेत्या व सहभागी बालगोपालांना बक्षीस वितरण केले.

याप्रसंगी प्रमोदजी पिपरे व योगिताताई पिपरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व बालगोपालांना तथा समस्त जनतेला तान्हा पोळाच्या शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा यामध्ये प्रथम पारितोषिक रेहान नैताम, द्वितीय पारितोषिक अंगना नैताम, तृतीय पारितोषिक रोहिणी कोठारे यांनी विजय संपादक केला. तसेच नंदीबैल घेवुन येणाऱ्या २०० बालगोपालांना उत्कृष्ट बक्षीस व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नरेंद्र भांडेकर, माजी नगरसेविका बेबीताताई चिचघरे, बालाजी भांडेकर, महादेव नैताम, गणेश नैताम, सहदेव चौधरी, तुकाराम नैताम, प्रदीप भांडेकर, महादेव भांडेकर, महादेव नैताम, सदुजी भांडेकर, विलास नैताम तसेच लांजेडा येथील नागरिक, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन विक्की नैताम, वैभव बोबाटे, किरण नैताम, संजय भांडेकर, निलेश सोमनकर, रोशन नैताम, संजय नैताम व इतर सदस्य यांनी केले.