Home गडचिरोली लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागडतर्फे हेडरी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस...

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागडतर्फे हेडरी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात

112

– कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ सप्टेंबर : एटापल्ली तालुका स्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेडरी येथे 6 सप्टेंबरपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. साई कुमार, भोलुभाऊ सोमनानी, संजू चांगलानी, रोमित तोमबर्लावार,  उपसरपंच राकेश कावडो, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील सौरभ कावडो, प्रतिष्टीत नागरिक, खेळाडू व गावकरी उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक क्रिकेट क्लब बांडे, द्वितीय क्रमांक युवा क्लब हेडरी तर तृतीय क्रमांक पेठा आणि चौथा पुरसलगोडी यांनी अनुक्रमे प्रथम बक्षीस 25000, द्वितीय बक्षीस 20000, आणि तृतीय बक्षीस 15000, चौथा 10000 रुपयांचे पारितोषिक मिळविले. सदर बक्षीस वितरण एल. साई कुमार एच. आर. हेड, भोलूभाऊ सोमनानी, संजूभाऊ चांगलानी, रोमित तोमंबर्लावार, उपसरपंच राकेश कावडो, प्रसाद नामेवार, कुंदन असूटकर, मिथुन जोशी, स्वप्नील वैरागडे, स्पोर्ट अधिकारी दिलीप बुराडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रदान करण्यात आले.

खेळाबरोबरच आपले आरोग्य आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवून, योग्य तो समन्वय घडवून आणावा, असे क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मान्यवरांनी सांगितले. सदर स्पर्धा 8 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाल्याने बक्षीस वितरण सोहळा अधिकारी, खेळाडू प्रशिक्षक व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.

error: Content is protected !!