प्रा. अतुलजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा येथे भाजपाची बैठक संपन्न

15

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ सप्टेंबर : भाजपा नेते माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा तालुका भाजपाची  बैठक पार पडली. यावेळी भाजपा पदाधिकारी यांचे मनोगत, समस्या, नवीन अध्यक्षाबाबत मत जाणून घेण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा अनु. जमाती मोर्चाचे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाशजी दत्ता, प्रा. डॉ. अशोकजी सालोडकर ब्रम्हपुरी, बंगाली आघाडी महामंत्री बिधानजी बैध्य, मा. उपसभापती बासुजी मुजुमदार, जिल्हा सचिव सुभाषजी गणपती, जिल्हा सचिव बादलजी शहा, महामंत्री दिलीपजी आत्राम, विजयजी बिश्वास, भाजयुमो तालुका अध्यक्ष संजयजी सरकार, श्रीमती प्रभातीजी भक्ता, महमंत्री मारोती पेंदाम, महामंत्री निखील हलधर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर व प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रकाशजी दत्ता यांनी तर संचालन महमंत्री निखीलजी हलधर यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी, शक्ती केन्द्र प्रमुख, आघाडीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.