भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजनात्मक बैठक

19

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माचित्राताई वाघ १३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. याकरिता गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवनी, गिलगाव, मुरमाडी व दिभना येथे नियोजनात्मक बैठक घेण्यात आली. तसेच संपर्क से समर्थन अभियानाअंतर्गत महाजन संपर्क, महाजन संवाद व घर-घर चलो अभियान सुध्दा राबविण्यात आले.

आंबेशिवणी येथील विलास झंझाळ, गिलगाव येथील गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, मुरमाडी येथील आवारी तर दिभना येथील विलास जेंगटे यांच्या घरी बैठका घेण्यात आल्या. तसेच पंतप्रधान मोदींजींनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती तेथील जनतेपर्यंत पोचवण्यात आली. यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आघाडी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे तसेच महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.