– नगरसेवक आशीष पिपरे यांच्या मागणीला यश
– खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळणार 12 हजारांचा निधी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली. ७ सप्टेंबर : काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहिले होते. ही बाब चामोर्शीचे नगरसेवक आशीष पिपरे यांनी खासदार अशोकजी नेते यांच्या लक्षात आणून देऊन त्यांच्या प्रयत्नाने त्या शेतकऱ्यांची समस्या सोडवून दिलासा दिला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीने 6000 रुपये सन्मान निधी मिळतो आता महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारने ही प्रत्येक शेतकऱ्यांना आता 6000 अतिरिक्त देण्याची घोषणा केली. म्हणजेच केंद्र व राज्य सरकार यांचे दोघांचे मिळून एकूण 12000 मिळतात. परंतु काही शेतक-यांनी केवायसी व आँनलाईन नोंदणी करुन सुध्दा तांत्रिक अडचणींमुळे ते लाभापासून वंचित होते असे भाडभिडी मो. व तळोधी क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी रवीभाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आशीष पिपरे यांची भेट घेतली असता या विषयावर तत्काळ खासदार अशोकजी नेते यांची भेट घेऊन हा विषय खासदार महोदयांना समजावून सांगितले असता खासदार महोदयांनी तत्काळ जिल्हाधिकारी गडचिरोली व मुख्य कार्यालय पुणे येथे फोन लावून ही अडचण सोडविली. आता काही दिवसांतच या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासदार महोदयांचे मनापासून आभार मानले आहे.