भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने घर-घर चलो महाजनसमर्क अभियान

88

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३ सप्टेंबर : मा. पंतप्रधान मोदीजी@9 अभियाना अंतर्गत संपर्क से समर्थन, घर-घर चलो अभियान भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक कॅम्प एरिया म्हाडा कॉलनी येथे मोदींजींनी केलेल्या ९ वर्षातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या अनेक विविध कामाची माहिती शकुन नंदनवार, मंजू क्रीष्णापुरकर, सोनाली बारापात्रे, स्मिता सहसाकडे, दिव्यांनी घरोटे, श्रीनिवास कोठावार, किशोर गव्हारे, शंकरराव दुधबळे, सुरेंद्र येरमलवार, मीरा वैरागडे यांच्या घरासह ईतरही २० ते २५ घरी भेटी देवुन माहिती देण्यात आली. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 90 90 90 2024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यात आले.

यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, भाजयुमो शहर अध्यक्ष सागर कुंभरे, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, श्रीकांतजी पतरंगे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.