– केंद्र सरकारच्या काळातील योजनांची नागरिकांना दिली माहिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरानगर वार्डात आज, ३ सप्टेंबर रोजी घर-घर चलो महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. या वार्डातील नागरिकांच्या घरी जावून त्यांना केंद्रातील मोदी सरकारने ९ वर्षाच्या कालावधीत केलेली लोकोपयोगी कामे, शासनाचे चांगले निर्णय व विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, शहर महामंत्री तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमो शहर महामंत्री हर्षल गेडाम, बूथ प्रमुख देवेंद्र कुनघाडकर, बूथ प्रमुख मंगेश वैरागडे, मनोज जवादे, रवी कुनघाडकर, रुमन वैरागडे, नरेंद भोयर, नरेश बुरे, आकाश पस्पुनुरवार यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.