– भाजप महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम
– महिलांचे रक्षण करण्याचे पोलीस बांधवांकडून घेतले वचन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात चामोर्शी व घोट पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याकडून महिलांचे रक्षण करण्याचे वचन घेतले.
चामोर्शी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीवास, पोलीस हवालदार राजेश गणवीर, जीवन हेडावू, पोलीस शिपाई पुसाटे, खोबरे, पिपरे यांना तर घोट पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहने, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे, कृष्णा सोळंकी, जया शेळके, ASI कुकुडकार, मुरारी गेडाम, हवालदार नरेश भसारकर यांना राखी बांधून पेढा भरवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अनिता रॉय, गडचिरोली शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, घोट पोलीस मित्र रुम्पा शहा, गीता रॉय, स्मृती ढाली, सारथी मंडल, सुचित्रा ढाली, माधवी पेशेट्टीवार यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.