आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली झाडापापडा इलाख्यातील ग्रामसभा व ३१ गावच्या प्रतिनिधींची बैठक

34

– स्थानिक लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २८ ऑगस्ट : झाडापापडा सारख्या अतिदुर्गम क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच व जिल्ह्याच्या इतिहासातही पहिल्यांदाच एखाद्या आमदारानी ग्रामसभांची बैठक आयोजित करून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन या बैठकीप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी झाडापापडा इलाख्यातील ग्रामसभा ३१ गावच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. या बैठकीला धानोरा तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, वन विभाग तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सह झाडापापडा इलाख्यातील ग्रामसभांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीमध्ये आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्देशही दिले.