कुरुड येथे कृषिदुतांनी राबविली पशु लसीकरण मोहीम

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली. २९ ऑगस्ट : चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिंनीनी ग्रामीण कृषी कार्यक्रमाअंतर्गत (RAWE) मंगळवार २९ ऑगस्टला जनावरांना होण्याऱ्या विविध संसर्गजन्य आजारांवर लसीकरणाची मोहीम पार पाडली.

देशभरात पसरलेल्या लम्पी आजाराने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. त्यामुळे लसीकरण करून आपल्या जनावरांना लम्पी आजाराला बळी जाऊ दयायचं नाही. त्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार व त्यावर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना या विषयावर पशु विकासन अधिकारी (LDO.) डॉ. अंजिक्य चकोर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात पशुवैद्यकीय दवाखाना चामोर्शी येथील पशुविकासन अधिकारी डॉ. अजिंक्य चकोर, ड्रेसर एन. पुसाटे व ड्रेसर मोहुर्ले यांनी महत्त्वाचा सहभाग नोंदविला. हे कार्यक्रम प्राचार्य डॉ. आदित्य कदम, सहाय्यक प्रा. छबील दुधबळे, सहाय्यक प्रा. श्रीकांत सरदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कृषी विद्यार्थिनी वैष्णवी बुध्देवार, तृप्ती घटे, श्रुतिका लोहाकारे, वैभवी पोफळी, गौरी चौधरी यांची उपस्थिती होती.