अतिवृष्टीने घर कोसळलेल्या महिलेला अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आधार

51

– मौशिखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील गिलगाव येथील सिंधुबाई भरणे या महिलेस दिली आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३ ऑगस्ट : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात मागील आठ- दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे गिलगाव येथील सिंधुबाई मुर्लीधर भरणे या महिलेचे राहते घर कोसळले. अडचणीच्या दिवसात घराची पडझड झाल्याने सिंधुबाई या महिलेसमोर निवाऱ्याची समस्या निर्माण झाली. या बाबतची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना मिळताच त्यांनी शिवसैनिकांसह गिलगाव येथे जाऊन सिंधुबाई भरणे यांना आर्थिक मदत दिली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार हे राजकारणासोबतच समाजकारण करीत असून गरजुंना मदत करणे व समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. मौशिखांब – मुरमाडी शेत्रात त्यांचा सातत्याने जनसंपर्क असून या क्षेत्रातील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी व मदत करण्यासाठी धावून जात असतात. कात्रटवार यांनी यापूर्वी सुद्धा या क्षेत्रातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यावेळी सुद्धा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सिंधुबाई भरणे या महिलेला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही कात्रटवार यांनी यावेळी दिली. त्याबद्दल गिलगाव वासियांनी कात्रटवार यांचे आभार व्यक्त केले आहे. सिंधुबाई भरणे या महिलेला मदत देताना यादव लोहंबरे, नवनाथ उके, संजय बोबाटे, संदीप आलबनकर, हरबाजी दासगाये, प्रशांत ठाकूर, सुरज उईके, अमित बानबले, संदीप भुरसे, दीपक लाडे, विलास दासगाये, विलास वासेकर, गोपाल मोगरकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलास फुलझेले, गौरव हर्षे, तानबाजी दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, हरिदास हर्षे, प्रवीण निसार, मिथुन चापडे, नेपाल लोहंबरे यांच्यासह गिलगाव येथील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.