भाजपाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी युवा नेते प्रशांत वाघरे यांची नियुक्ती

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ जुलै : भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे जिल्हा महामंत्री, युवा ओबीसी नेते प्रशांत वाघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नागदेवे यांच्याकडे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी हालचालींना वेग आला होता.

गडचिरोली जिल्ह्यात लोकसभेसह सर्व विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येत असलेल्या ओबीसी समाजाला किमान संघटनेत तरी प्रतिनिधीत्व मिळावे असा सूर उमटत होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजातील युवा चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेत प्रशांत वाघरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.