महादेवगड येथे आ. कृष्णाजी गजबे यांनी साधला टिफिन बैठकीत संवाद

57

विदर्भ क्रांती न्यूज

कुरखेडा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या अरततोंडी येथील महादेवगड देवस्थान परिसरात रविवार, १६ जुलै रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांची टिफिन बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून आमदार कृष्णाजी गजबे यांनी कुरखेडा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांच्याशी संवाद साधत सर्वांनी सोबत आणलेल्या जेवणाच्या डब्याचा आस्वाद घेतला.

यावेळी मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियानाबाबत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. एकमेकांच्या डब्यातील अन्न अनेकांनी वाटून खाल्ले. यामुळे एकमेकांमधील ऋणानुबंध, प्रेम वाढीस लागावा याकरिता असे उपक्रम महत्वाचे ठरत असतात, अशी भावना आ. गजबे यांनी यावेळी व्यक्त केली. खरीप हंगामातील रोवणीची कामे असताना सुद्धा अनेक गावातील नागरिकांनी या टिफिन डबा पार्टीत सहभागी होवून संवाद साधला. सर्वांनी खाली बसून पंगतीत भोजन केले.

याप्रसंगी आमदार कृष्णाजी गजबे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, तालुका महामंत्री अॅड. उमेश वालदे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, तालुका महामंत्री उल्हास देशमुख, नगरसेवक रामभाऊ वैद्य, सभापती अतुल झोडे, नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेष मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य रमेश बावन‌थडे, रोशन सय्यद, पुष्पराज राहागडाले, किशोर भांडारकर, हेमंत पाटील खुणे, नितीन झोडे, खुशाल दखने, राहूल गिरडकर, बंटी देवढगले, मोहनलाल देशमुख, अमूल ठलाल यांच्यासह परिसरातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.