डॉ. किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढाळा येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमेटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १४ जुलै रोजी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच अपर्णा राऊत, माजी सभापती परसरामजी टिकले, तालुका अध्यक्ष देसाईगंज राजूभाऊ बुल्ले, उपसरपंच गजानन सेलोटे, माजी उपसभापती नितीनजी राऊत, तसेच अनेक मान्यवर, शिक्षकवृंद उपस्थित होते.