शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सोडण्यात याव्या

15

– अजय कंकडालवार यांनी अहेरीचे आगार प्रमुख घागरगुंडे, विभागीय नियंत्रकांशी चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, १६ जुलै : तालुक्यातील आलापल्ली ते आष्टी रस्त्यावर वसलेल्या खमनचेरू, बोरी, राजपूर, शिवनीपाठ, जामगाव, टिकेपली, धन्नूर, धमपूर, चौडमपली, चंदनकेळी आदी गावात बससेवा वेळेवर मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना शाळेत पोहचण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

महामंडळ आगार प्रमुख यांचे म्हणने आहे की, आम्ही बसेस वेळेवर सोडतो परंतु सुरजागडच्या जड़ वाहतुकीमुळे रस्त्यांवर गाड्या उभे राहतात. त्यामुळे बसेस विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेवर पोहोचू शकत नाही असे सांगितले. त्यामुळे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्वरीत तोडगा, असे सूचना दिल्या. यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आगारातील कर्मचारी उपस्थित होते.