जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्याबाबत नियोजन सभा

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० जुलै : येथील आदिवासी जंगल कामगार सोसायटीच्या लहुजी मडावी सभागृहात जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन केले. या सभेला आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष इंजि. माधवराव गावड, बाबुराव मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव सदानंद ताराम, सचिव अमरसिंग गेडाम, आनंदराव कंगाले, भरत येरमे, नारीशक्ती संघटना अध्यक्ष जयश्रीताई येरमे, मनीषा मडावी, वसंतराव कुलसंगे व पदाधिकारी उपस्थित होते.