कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोलीत स्वागत

51

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री मा‌. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रथम आगमनानिमित्त स्थानिक इंदिरा गांधी चौकात पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम आगमनानिमित्त चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

नवनियुक्त कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, श्रीनिवास गोडसेलवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.