पूर्व विदर्भ दौरा गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० जुलै : पूर्व विदर्भ दौरा गडचिरोली जिल्ह्यापासून 9 जुलैपासून सुरू करण्यात आला. काल खासदार अशोक नेते यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेण्यात आली. तसेच संघ जिल्हा कार्यवाहक घिसुलालजी काबरा यांची भेट घेण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रा. मुनघाटे आणि त्यांचे विद्यार्थी सोबत संघ कार्यालयात भेट घेण्यात आली. जिल्हा सोशल मीडिया प्रमुख यांच्यांयाशी भेट झाली. त्यानंतर जिल्हा महिला मोर्चाची बैठक पार पडली.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत घर चलो अभियानची सुरुवात करण्यात आली. धन्यवाद मोदीजी, लखपती दीदी, सोशल मीडिया, महिला संघटन, मोदी @ 9 अभियान अशा विविध विषयावर चर्चा झाली. जिल्ह्यातील अनेक मान्यवर लोकांच्या भेटी घेऊन महिला मोर्चा चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अल्का आत्राम, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस सौ. रेखाताई डोळस, वर्षा शेडमाके, लताताई पुंघाटे, मीनाताई कोडापे, लताताई मुनघाटे, शिल्पा रॉय, रहिमा सिद्धिक्की, पल्लवी बारापात्रे, अर्चना मुनघाटे यांची उपस्थित होती.