विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ जुलै : राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागलेले कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार ना. धर्मरावबाबा आत्राम आज शुक्रवार, ७ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच ते गडचिरोलीत येत आहेत. या दौऱ्यात ते देसाईगंज (वडसा), आरमोरी, पोर्ला, गडचिरोली येथील खाजगी कार्यक्रमांना भेट देणार आहेत.