विदर्भ क्रांती न्यूज
ब्रम्हपुरी, 6 जुलै : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील संचालकांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काॅंग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील रहिवासी असलेले राजेंद्र जांभुळे, हितेंद्र निमगडे, कैलास भोयर हे कळमगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आहेत. ते यापूर्वी भाजपा पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते व भाजपाकडून सहकारी संस्थेवर निवडून गेले होते. परंतु ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा झपाटा बघता त्यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काॅंग्रेस पक्षात ब्रम्हपुरी येथील आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि. प. सदस्या स्मिताताई पारधी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले यांच्यासह अन्य काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.