गडचिरोली, अहेरी व चामोर्शी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जल्लोष

51

– राकॉंचे धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा – शिवसेना युतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर गडचिरोली, अहेरी व चामोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

गडचिरोली येथे जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, प्रा. रिंकू पापडकर, श्रीकांत भृगुवार, कपिल बागडे, प्रसाद पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नव्या सत्तासमीकरणात सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अहेरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मधुकर कोलुरी, राकाँ तालुकाध्यक्ष एम. डी. शानू, नगरसेवक सतीश भोंगे, रंजीत गंगापूरपु, माजी नगरसेवक रवी रालाबड़ीवार, मदनय्या मांदेशी, नागेश गंगापूरपु, रायुका जिल्हा उपाध्यक्ष देवय्या येनगदुला, गणेश बोधनवार, विजय रंगुवार उपस्थित होते.

चामोर्शी येथे जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा गटनेते राहुल नैताम, राकॉंचे जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक लौकिक भिवापुरे, तालुकाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती निशांत नैताम, शहराध्यक्ष एड. डिम्पल उंदिरवाडे, नरेश अलसावार, सुरज अल्कावार, यशवंत त्रिकांडे, तुषार बनपूरकर, पोषक गेडाम, विनोद पेशट्टीवार, धनराज मडावी, सतीश सोमनकर, प्रवीण उंदिरवाडे, संतोष लटारे, पुरुषोत्तम बुरांडे, रिंकू वासेकर, संजय पडालवार, अनिल आइंचवार, देवाजी बारसागडे, सतीश सोमनकर, राकेश पडालवार, भूषण परचाके, शंकर पडालवार, किशोर आडपवार, राकेश पिपरे, मुरली पिपरे, रवी गोपावार, प्रदीप भांडेकर, शुभम बनपूरकर, गोपाल गेडाम, निखील भांडेकर, करण शेट्टे, राहुल एडलावार, सचिन, उंदिरवाडे योगेश गव्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.