जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

55

– महिला आघाडी प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 3 जुलै 2023 : जनसामान्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व जनमानसात सामान्य माणसाशी नाळ जोडून समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेले विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विविध कार्यक्रमानिमित्त भेट दिली असता येथे आयोजित, राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियान निमित्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी यांच्या हस्ते भव्य राष्ट्रीय सिकलसेल अभियानाचे दुरचित्र फितद्वारे शुभारंभ करण्यात आला.

वेळी भाजप प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे, माजी समाजकल्याण सभापती रंजिताताई कोडापे, पल्लवी बारापात्रे, रेखा ढवळे, भूमी भरडे, सौ. वैष्णवीताई नैताम, सौ. लताताई लाटकर, कोमलताई बारसागडे, शिल्पा भोयर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, येथील प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धूर्वे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदर सिकलसेल निर्मूलन अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात यावे, असे आवाहन यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.