वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची गडचिरोलीतील २ जुलैची जाहीर सभा रद्द

46

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ जुलै २०२३ : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त संपुर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाजनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने २ जुलै रोजी दुपारी ४ वाजता महाराजा लॉंन गडचिरोली येथे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. माञ काहीं कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सभेचे प्रमुख तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली आहे.