भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत खा. नेते यांचा वाढदिवस साजरा

23

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ जुलै २०२३ : भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नई दिल्ली येथे साजरा करण्यात आला. यावेळी खा. अशोकजी नेते यांना जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. बी. एल. संतोषजी, राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री. शिवप्रकाशजी, राष्ट्रीय संघटक श्री. व्ही. सतीशजी, भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोदजी तावडे, भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री. तरुणजी चुग, राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी श्री. सी. टी. रवीजी आणि अन्य सर्व राष्ट्रीय पदाधिकारी व लोकसभा व राज्यसभा खासदार  यांनीही खा. नेते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.