युवा नेता ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

40

– रुग्णालयात दुध, फळे व बिस्किट वाटप, अपंग बांधवांना छत्री वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, 27 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज, 27 जून रोजी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दुध, फळे व बिस्किट वाटप तर विकलांग व अपंग बांधवांना पावसाच्या बचावासाठी छत्री वितरण करून व अन्य विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालयात डॉ. के. एम. धुर्वा यांच्या हस्ते रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दुध, बिस्किट व फळे वितरित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या हस्ते विकलांग व अपंग नागरिकांना पाऊस व उन्हाच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात छत्र्या वितरित करण्यात आले.
दुध, बिस्किट व फळे आणि छत्री वितरणाच्या कार्यक्रमात आलापल्ली ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल श्रीरामवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, बाबूराव तोरेम, संदीप सुखदेवे, किशोर करमे, तिरुपती मड़ावी, मखमूर शेख, संतोष येमुलवार, अफसर पठाण आदी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.