बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

54

– सुभाषग्राम येथील सामाजिक न्याय दिनात बार्टी पुणे येथील अधिकारी उपस्थित

– बार्टीने केले बंगाली बांधवांच्या जातीचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली. 27 जून : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून बंगाली बांधवांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असून बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, असा विश्वास आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी व्यक्त केला.

बंगाली बांधवांच्या वतीने सुभाषग्राम येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बार्टी पुणे येथील प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेमकुमार हनवट, सचिव सचिन ससाने यांच्यासह बार्टीचे अधिकारी तसेच दीपक हलदर, शैलेंद्रजी खराती, रणजीत मंडल ,सतीश रॉय ,कृष्णा रॉय, प्रवीण पाल,सुरेश शहा, विधान व्यापारी यांच्यासह बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.