तळागाळातील गोरगरिबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार : अजय कंकडालवार

44

– ताडगाव येथे चर्चासत्र मेळावा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

भामरागड, 26 जून 2023 : तालुक्यातील ताडगाव येथे आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभेच्या वतीने चर्चासत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील कानाकोपऱ्यातून आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते व नागरिक एकत्र आले होते. यावेळी उद्घाटनस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार म्हणाले, आदिवासी विद्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा असून याच आम्हाला अभिमान असून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. वेळ देऊन संघटनेचे काम वाढवित आहे हे कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही, त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वतः पुढाकार घ्यावा व संघटन तालुक्यातील ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही कंकडालवार यांनी केले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे म्हणाले, आविसं ही संघटना लहान लहान कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, अन्याय विरोधात अनेक आंदोलन, मोर्चे, उपोषण केले. याकामी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झाले असताना जिवाची पर्वा ना करता अनेकांना राजकीय क्षेत्रात मोठ्यामोठ्या पदांवर पोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून आज जिल्ह्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली असून आदिवासी विद्यार्थी संघटना ही आजही अन्याय, अत्याचार विरोधात सर्व घटकांसोबत उभे राहून आपल्या हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर असून तडगळतील कार्यकर्ता हा संघटनेच्या आत्मा असल्याचे सांगत येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जोमाने कार्य करत संघटनेसाठी वेळ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी मंचावर विष्णुजी मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड, लालसू आत्राम माजी सभापती, सर्जु सडमेक नगरसेवक भामरागड, राकेश महाका नगरसेवक भामरागड, तपेश हलदर प्रतिष्ठीत नागरिक भामरागड, दिलीप उईके नगरसेवक भामरागड, नंदुभाऊ मट्टामी आविसं अध्यक्ष एटापल्ली, श्रीरामजी हेडो, प्रज्वल नागुलवार आविसं सचिव एटापल्ली, आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,रोजा करपेत नगराध्यक्ष न. पं. अहेरी, शैलेश पटवर्धन नगर उपाध्यक्ष अहेरी, अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सुनिता कुसनाके माजी जिल्हा परिषद सदस्य, भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी, सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी, नौरास शेख नगरसेविका अहेरी, प्रशांत गोडशेलवार नगरसेवक अहेरी, दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच किस्टापूर, महेश लेकुर ग्रापं सदस्य, प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली, नरेंद्र गर्गम ग्रामीण अध्यक्ष आविसं व अजयभाऊ मित्र परिवार अहेरी, कमला कुरसाम सरपंच येचली, नीलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, सिताराम मडावी सामजिक कार्यकर्ता जिजगाव, किरण कोरेत सरपंच पेरमिली, डॉ. सत्तमवार सा.आरोग्य वर्धनी ताडगाव, संजय येजुलवार उपसरपंच येचली, अनिल करमरकर कृषि बाजार संचालक, नामदेव हिचामी नगरसेवक एटापल्ली, बालु बोगामी उपसरपंच लाहेरी, अजय गावडे पो. पा. उडेरा, मट्टामी पो. पा. अलेंगा, कोकण सरकार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी, महेश बिरामवार, अजय कोरेत, रेणू कुळ्येटी, प्रकाश मडावी, संतोष उसेंडी, सुनील मडावी, नरेंद्र मदावी, दल्लू उसेंडी, दानु आत्राम, संतोष कोर्सा, प्रवीण सेगाम, राकेश संगमवर, देवू तलंडी, आकाश धूर्वे, ललित बंडावार, चीनु सडमेक, प्रभाकर मडावी, दिनेश जुमडे, पंकज पुजलवार, गणेश नागपूरवार, भास्कर सडमेक, काशिनाथ मडावी, संदिप गावडे, रावजी मडावी, श्रीनिवास दुर्गे, नारायण तानसेन, श्रीनिवास कुंदाराम व समस्त भामरागड तालुक्यातील आविसं व ग्रामसभा तथा अजयभाऊ मिञपरिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर चर्चासत्र मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक माजी उपसभापती भामरागड लालसू आत्राम, जगदीश कोंकमुट्टीवार यांनी परिश्रम घेतले.