सकारात्मक विचार, दृढ आत्मविश्वास व संघर्ष वृत्ती हाच यशचा मूलमंत्र : माजी मंत्री वडेट्टीवार

103

– ब्रम्हपुरी येथे “जॉब महोत्सव’, सुशिक्षित हजारो युवक – युवतींचा सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : जीवनात येणारे यश आणि अपयश हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्यात नैराश्य आल्यास त्याला थारा न देता संघर्ष वृत्तीतून सकारात्मक विचार व दृढ आत्मविश्वासाने संकटाचा सामना केल्यास निश्चित यशाचे शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथील स्टेम पोदार लर्न स्कूल येथे आयोजित जॉब महोत्सव 2023 कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
विजय किरण फाउंडेशनतर्फे ‘रोजगार आपल्या दारी’ या स्तुत्य उपक्रमांतर्गत आयोजित जॉब महोत्सव – २०२३ कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार, अध्यक्ष म्हणून माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रमुख अतिथी म्हणून, ॲड. राम मेश्राम, ॲड. गोविंद भेंडारकर, काँग्रेस ओबीसी विभागाचे धनराज मुंगले, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, ब्रम्हपुरी काँग्रेस ता. अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, सावली तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, सिंदेवाही ता. अध्यक्ष रमाकांत लोधे, नगर परिषद सभापती विलास विखार, शहराध्यक्ष बाळा राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमुरकर, राजेश कांबळे, स्मिता पारधी, माजी पं. स. सदस्य थाणेश्वर कायरकर, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, विधानसभा क्षेत्र ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबले, सीमा सहारे, सावली तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष उषा भोयर, ब्रम्हपुरी महिला शहराध्यक्ष योगिता आमले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, जनतेला उपाशी ठेवून स्वतः उपाशी राहणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. माझे संपूर्ण जीवनमान हे संघर्षमय राहिले असून केवळ हिमतीच्या भरोशावर संकटांवर मात करीत जनसेवेच्या माध्यमातून राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारण्यात यश मिळविले. संधी ही सर्वांसाठी उपलब्ध असते ती ओळखणे गरजेचे आहे. आज महोत्सवात आलेल्या प्रत्येकाने उज्वल भविष्य घडविण्यासाठी परगावी जाण्याचे व राहण्याची कस बांधावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार व अन्य मान्यवरांनी उपस्थितांंना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेत अविरत सेवा देणारा सच्चा जनसेवक म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. याच जनसेवेच्या माध्यमातून आज ब्रम्हापुरी येथे माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमतः च विजयकिरण फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जॉब महोत्सवात संपूर्ण जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी हजारोंच्या संख्येने सहभाग दर्शविला. आयोजित जॉब महोत्सवासाठी देशातील तसेच राज्यातील नामांकित कंपनिंना यावेळी पाचारण करण्यात आले होते. महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.तर विद्यानगरी ब्रम्हपुरी प्रथमतः च आयोजित जॉब महोत्सवास विविध कंपन्यांकडून हजारांहून अधिक युवक युवतींना रोजगार ऑफर देण्यात आली. तर सहभागिंकडून महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.