जॉब महोत्सवातून नामवंत कंपन्यांकडून हजारो युवकांना जॉब ऑफर

97

– माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी येथे आयोजित जॉब महोत्सवात देशातील नामवंत कंपन्यांकडून ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील हजारांहून अधिक युवक – युवतींना थेट मुलाखतीनंतर जॉब ऑफर हाती मिळाली.

विजयकिरण फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ब्रम्हपुरी जॉब महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदविला.

माझे संपूर्ण जीवनमान हे संघर्षमय राहिले असून केवळ हिमतीच्या भरोशावर संकटांवर मात करीत जनसेवेच्या माध्यमातून राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारण्यात मी यश मिळविले. संधी ही सर्वांसाठी उपलब्ध असते, योग्य वेळेवर ती संधी ओळखणे गरजेचे आहे. आज महोत्सवात आलेल्या प्रत्येक तरुणाने उज्वल भविष्य घडविण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. कष्टाला यश नक्की मिळते हा माझा अनुभव आहे.