अहेरी येथील क्रीडापटू आजारी नागु कोडापेला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

54

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : येथील नेहमी क्रीडा क्षेत्रात चर्चेत असणारी नागू कोडापे ही गेल्या १० दिवसापासून लूपस या आजारामुळे चंद्रपूर येथील यशोदा अँड हेल्थकेअर इथे ऍडमिट होती. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने नागू कोडापेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. नागपूर येथील प्रसिद्ध असलेला क्रीम्स हॉस्पिटलचा ICU मध्ये नागु कोडापेला भरती करण्यात आले आहे. तिला पुढील उपचाराकरिता घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली आणि लगेच माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी तातडीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच डॉक्टरांशी बोलून नागपुरात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे ह्यासाठी राजेंनी प्रयत्न केले.