राजाराम परिसरातील शेतकर्‍यांचा धान खरेदी/विक्री केंद्राचा (गोडाऊन) जागेचा प्रश्न मार्गी

57

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आर्थिक सहकार्य

– राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत, शेतकऱ्यांनी मानले राजेंचे आभार

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : तालुक्यातील राजाराम परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी दुरवरच्या कमलापुर येथील केंद्रावर जावे लागत असते. त्यामुळे गरीब शेतकर्‍यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षांपासुन राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबीत होती. बर्‍याच तांत्रीक बाबींच्या मुद्द्यावर मागणी पुर्ण होत नव्हती परंतु राजे अम्ब्रिशराव महाराजांनी पालकमंत्री असताना जोर लावुन धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळवुन दिली.

महसुल आणि वन विभागाकडे सोयीची जागा ऊपलब्ध नसल्याने पुन्हा जागेचा प्रश्न ऊभा ठाकला. गावकर्‍यांनी एकत्र येवुन पुढाकार घेतला व एक मोक्यावरची खाजगी जागा खरेदी करुन धान खरेदी केंद्रासाठी शासनाला ऊपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. परंतु समस्या सुटण्याचे नावच घेईना. जमिन मालकाला पैशाची तातडीची गरज भासली आणि गावकर्‍यांकडे पुरेशी रक्कम जमा झाली नव्हती. त्यामुळे जमिनीचा व्यवहार फिसकटण्याची स्थिती निर्माण झाली.कमी वेळात मोठी रक्कम गोळा करणे परिसरातील शेतकर्‍यांसाठी अशक्यप्राय होते. शेवटी सरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी मदतीसाठी राजे साहेबांकडे धाव घेतली. राजे साहेबांनी समस्येचे गांभीर्य ओळखुन सढळ हस्ताने १ लाख रुपयांची आर्थीक हातभार दिला त्यामुळे धान खरेदी केंद्रासाठी जागेचा मोठा अडसर दुर झाला. राजाराम ग्रा.पं.क्षेत्रातील राजाराम, सुरायपल्ली, कोंकापार व खांदला ग्रा.पं. क्षेत्रातील खांदला, पत्तीगाव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेली, रायगटा, गोल्लाकर्जी आणि तिमरम ग्रामपंचायत क्षेत्रातील तिमरम, गुड्डीगुडम, निम्मलगुडम इत्यादी गावांना ह्या धान खरेदी केंद्राचा लाभ होईल ह्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी राजेंचे आभार मानले आहे.

यापुर्वीही पालकमंत्री असतांना राजे साहेबांनी यापरिसरात रस्त्यांचे जाळे विणले,पुल बांधुन शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला. आता धान खरेदी केंद्राच्या सर्व समस्या मार्गी लावून शेतकर्‍यांचे खरे कैवारी बनले.

यावेळी रविंद्र पंजलवार, मनोज सिडाम, वसंत सिडाम, संतोष तोर्रेम, धर्मा आत्राम, शंकर सिडाम, वसंत तोर्रेम, महेश सिडाम, महादेव आलाम, नागेश कन्नाके सरपंच, भास्कर तलांडे माजी सभापती पं. स.अहेरी, विनायक आलाम माजी सरपंच, नारायण कंबागोनिवार ग्रा. पं सदस्य, मलय्या तोर्रेम, दीपक अर्का, मुत्ता पोरतेट, राकेश तलांडे, मोहन वेलादी, संजय पोरतेट, तिरुपती कुळमेथे, सुखदेव आत्राम, विलास करपेत यांच्यासह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.