मोद्दूमडगू येथील बासंती पुजा उत्सव निमित्ताने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट देऊन घेतले मातेचे आशीर्वाद

50

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली जवळील मोद्दूमडगु परिसरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने असल्याने सद्या बासंती पूजा उत्सव सुरू असून दरवर्षी सदर उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. बासंती पूजा उत्सव निमित्त माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नुकतेच आलापल्ली जवळील मोद्दूमडगू दुर्गा मंदिरात भेट देऊन पूजन करत मातेचे आशीर्वाद घेतले.

दरवर्षीच बासंती पुजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 27 मार्च रोजी शष्टी पुजा करून घटस्थपणा करण्यात आले. त्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी असे 31 मार्चपर्यंत पाच दिवस पूजापाठ करण्यात येणार आहे.यादरम्यान ह्या ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सुरू असलेल्या बासंती पूजेत सहभागी होत देवीचे दर्शन घेतले आणि पूजन करून आशीर्वाद घेतला. तसेच यावेळी पूजा कमेटी तर्फे राजेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कुमार अवधेशराव बाबा, प्रविणराव बाबा सह अहेरी व आलापल्ली येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.