बासंती पुजा उत्सव निमित्ताने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट देऊन घेतले दुर्गा मंदिरात आशीर्वाद

42

विदर्भ क्रांती न्यूज

मुलचेरा : तालुक्यात बंगाली बांधव मोठ्या संख्येने असल्याने त्यामुळे काही ठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आता बासंती पूजा उत्सव सुरू असून दरवर्षी सदर उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. बासंती पूजानिमित्त माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सुंदरनगर, मथुरानगर आणि गणेशनगर दुर्गा मंदिरात भेटी देऊन पूजन करत मातेचे आशीर्वाद घेतले.

तालुक्यात दरवर्षीच बासंती पुजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 27 मार्च रोजी शष्टी पुजा करून घटस्थपणा करण्यात आला. त्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी असे 31 मार्चपर्यंत पाच दिवस पूजापाठ करण्यात येणार आहे. यादरम्यान विविध ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ऑर्केस्ट्रा, नृत्य, बाबूल गांन अश्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. 31 मार्च रोजी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मथुरानगर, सुंदरनगर आणि गणेशनगर येथे सुरू असलेल्या बासंती पूजेत सहभागी होत देवीचे दर्शन घेतले आणि पूजन करून आशीर्वाद घेतला. तसेच यावेळी पूजा कमिटीतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुलचेरा तालुक्यातील या ठिकाणी बासंती पूजा, भागवत कथा,काली पूजा, विश्वकर्मा पूजा, आदी पूजा मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यावेळी कुमार अवधेश बाबा आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, उपाध्यक्ष विजय बिश्वास, उपसरपंच तपन मल्लिक, जिल्हा सचिव सुभाष गणपती, शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला, ग्रा. सदस्य बादल शाह, किशोर मल्लिक सह मुलचेरा तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.