धानोरा येथील तालुका क्रिडांगणासाठी ५ कोटी रुपये मंजूर

98

– खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने युवा नेते सारंग साळवे यांच्या प्रयत्नाना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी धानोरा तालुका क्रीडांगणासाठी वारंवार मागणी केली होती व यासाठी धानोरा येथील भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग साळवे, साजन गुंडावार, संजय कुंडू, सुभाष धाईत, सुभाष खोबरे, लंकेश म्हशाखेत्री, राकेश खरवडे, प्रकाश कुर्झेकर, राकेश दास, घनश्याम मडावी, गणेश भुपतवार व स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी येथील क्रीडांगणाकरिता गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने वारंवार सबंधित मंत्रालयात पाठपुरावा करीत होते व नुकताच सदर मागणी मंजूर करण्यात आली असून तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये 2 मार्च 2023 च्या आदेशान्वये मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयानुसार ५० लक्ष रुपयांंचा निधी आधीच वितरित करण्यात आला आहे. सदर निर्णयाचे समस्त धानोरा तालुक्यातील जनतेने स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार व गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे सुद्धा जाहीर आभार मानले आहे.
धानोरा येथील क्रीडा संकुल मंजूर झाल्याने तालुका वासियांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून धानोरा वासीयांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे अभिनंदन केले आहे.