केशवराव कात्रटवार यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशवराव कात्रटवार यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते येथील नगर परिषदेचे माजी सभापती प्रा. राजेश कात्रटवार व शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, ४ मार्च रोजी शहराजवळील वैनगंगेच्या बोरमाळा घाटावर विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी न. प. उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी केशवराव कात्रटवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून शोकसंवेदना व्यक्त केली. केशवराव कात्रटवार यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंड असा बराच आप्तपरिवार आहे.