– निवेदनाद्वारे केली मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली – चिमुर या क्षेत्रातील कृषीविज पंपजधारक शेतकऱ्यांना दिवसा १२ तास कृषि विजपंपाचा लाभ व फायदा मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याशी खासदार अशोकजी नेते यांनी सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.
गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात जंगलव्याप्त परिसर असून परिसरात वाघाची दहशत फार मोठया प्रमाणात आहे. तसेच कृषि विजपंपधारक शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावर जावे लागेल. दिवसा लोंडसेडिंगमुळे वीज बंद केल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतपिकांवर पाणी करण्यासाठी रात्रीला जावे लागते. परंतु रात्रीला अंधार असल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात वाघाचा, कीटकांचा, पशुपक्षी यांचा शेतकऱ्यांना फार मोठया प्रमाणात सामना करावा लागतो.
जर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज कृषी पंप विज धारक शेतकऱ्यांना दिल्यास याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होईल.या संबंधित तात्काळ शेतकऱ्यांच्या विषयी गांभीर्याने दखल घेत खासदार महोदयांनी १ मार्चला मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.