Home गडचिरोली आलापल्ली येथील नवीन बसस्थानकाचा कामाची माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली...

आलापल्ली येथील नवीन बसस्थानकाचा कामाची माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली पाहणी

145

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली शहर हे अहेरी विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असून प्रमुख मार्ग येथूनच जातात. शिवाय प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी प्रशस्त बसस्थानक नसल्याने प्रवाशांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहिल्याने मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विशेष प्रयत्न करून आलापल्ली येथे जवळपास साडेतीन कोटी रुपयांची निधी मंजूर करून नवीन बसस्थानक मंजूर केले होते. महसूल विभागाकडून जागाही उपलब्ध करून दिली होती. या कामाचे भूमिपूजनही २०१९ मध्ये राजे साहेबांनी केले होते.

आलापल्ली बसस्थानकाचे काम सद्या ९० % पूर्ण झाले असून नुकताच आलापल्ली दौऱ्यावर असताना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ह्या कामाची स्वतः पाहणी करून पूर्ण माहिती घेतली तसेच कामाबद्दल समाधानही व्यक्त केले. ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!