टॅक्सी चालक मुलगी किरणला लंडन येथे उच्च शिक्षणासाठी दिली ५ लाखांची मदत

76

– गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश किरणला स्वाधीन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील टॅक्सी चालक मुलगी किरण कुर्मावार हिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जायचे होते. तिथे तिला मोठ्या महाविद्यालयात प्रवेशही नक्की झाले होते. परंतु तिची हलाखीची परिस्थिती आहे. ती स्वतः आपल्या वडिलांसोबत टॅक्सीत ड्रायव्हरकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, ह्याही परिस्थितीत तिने उस्मानाबाद येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. पुढील शिक्षणासाठी तिला लंडन येथे जायचे आहे. परंतु आर्थिक अडचण निर्माण झाल्याने लंडन जायचे कसे ह्या विवंचनेत किरण असल्याबाबतची बातमी एका न्यूज चैनलवर प्रसिद्ध झाली आणि ही बातमी बघून रोटी फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. रोहितजी माडेवार यांनी त्वरित मदतीचा हात समोर केला आणि त्यांनी चौकशी करून अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्याशी संपर्क केला. रवी यांनी तिचा संपर्क नंबर शोधून तिच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर रेगुंठा येथे झालेल्या एका कार्यक्रमात किरणला डॉक्टर मा. रोहितजी माडेवार तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रोटी फाउंडेशन, नागपूर तर्फे ५ लाख रुपयांचा चेक किरणला स्वाधीन करण्यात आला. तिला भविष्यात येणारेे सर्व अडथळे दूर करण्यासाठी समोरही मदत करण्याचे आश्वासनही यावेळी रोटी फाऊंडेशन नागपूरतर्फे देण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, डॉ. रोहित माडेवार, जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के, प्रशांत शेंडे, रवी नेलकुद्री, प्रशांत नामेलवार, राकेश कोसरे, विनोद जिल्लेवार, डॉ. तिरुपती कोलावार, डॉ. स्नेहल मेक्रतवार, सूचित कोडेलवार, रितिक कुंभारे, अनुराग पिपरे, आकाश तुलसीगिरी, रेगुंठा पोलीस स्टेशनचे प्रभारी सानप, सूचित कोडेलवार, प्रमोद भोयर, संतोष पडलवार, मल्लांना संघरथी, अजयजी मुकेशी व रेगुंठा परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.