शासनाचा जाहीर धिक्कार करीत हजारो अंगणवाडी महिला उतरल्या रस्त्यावर

34

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अंगणवाडी महिला आपल्या न्याय मागण्याकरिता गेल्या चार महिण्यापासून सतत संघर्ष करीत आहेत. या चार महिण्याच्या काळात बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सतत आश्वासने दिली. प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे वेळोवेळी आश्वासने दिली. मुख्यमंत्री म्हणाले, दिवाळीपूर्वी मानधन वाढ घोषित करण्यात येईल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाल कल्याण मंत्री या त्रिकुटाने मानधन वाढीची घोषना २६ जानेवारीला करण्यात येईल, असे घोषित केले होते. परंतु प्रत्येक्षात काहीही झाले नाही. या नेत्यांनी तोंडचालाकी करुन वेळ निभावून नेली. याच्या निषेधार्थ २० फरवरीपासून राज्यांतील दोन लाख अंगणवाडी महिलांनी बेमुदत संप पुकारला आहे. या निमित्ताने धरणा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. दहीवडे म्हणाले, शासनानेच संप करण्यास अंगणवाडी महिलांना भाग पाडले. दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली असती तर संप फुकारण्याची वेळ अंगणवाडी महिलांनवर आली नसती. किशोर जामदार म्हणाले, अंगणवाडी महिला पुर्णकालीन आहेत. त्यांना ग्रॅज्युटी लागु आहे. असा महत्वपूर्ण निर्णय देशाचे सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता अंगणवाडी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते ही फार मोठी शोकांंतिका आहे. राजेश पिंजरकर म्हणाले, सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीनंतर सेविकेला एक लाख रुपये तर मदतनिसला ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता अंगणवाडी महिलांना मागणी करावी लागते, रस्त्यावर उतरावे लागते याचे या सरकारला काहीही देणेेेघेणे नाही. प्रमोद गोडघाटे म्हणाले, एकजुटीच्या बळावर आपण ही लढाई जिंकू या विश्वासाने लढण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. अमोल मारकवार, रामदासजी जराते, जयश्री वेलदा, हेमंत डोलीकर, राजू सातपुते, विठ्ठल प्रधान यांनीदेखील अंगणवाडी महिलांना मार्गदर्शन केले. ललीता केदार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटले व मागण्यांंचे निवेदन सादर केले. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्यााकरिता भारती रामटेके, छाया कागदेलवार, सुमन तोकलवार, विठाबाई भट, संगीता वडलाकोंडावार, उर्मिला गव्हारे, सरीता आत्राम, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार यांनी विशेष परिश्रम घेतले.