जिल्हा न्यायालयात कुसुमाग्रज वाचन कट्टा सुरू

71

– जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांच्या हस्ते कुसुमाग्रज वाचन कट्टाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दालनात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिवसाचे औचित्य साधून माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. बी. शुक्ल यांच्या हस्ते कुसुमाग्रज वाचन कट्टाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. बी. शुक्ल होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ मा. यु. एम. मुधोळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील, दिवाणी न्यायाधिश (व. स्तर) एम. आर. वाशीमकर, मुख्य न्यायदंडाधिकारी मनोद तोकले, सह दिवाणी न्यायाधीश चंद्रदीप रघुवंशी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश आर. आर. खामतकर, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश एन. सी. सोरते मॅडम, अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश पठाण मॅडम व जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. बी. शुक्ल यांच्या संकल्पनेतून कर्मचाऱ्यांंसाठी शासकीय कार्यालयात वाचन कट्टाची निर्मीती करण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. यु. बी. शुक्ल, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ मा. यु. एम. मुधोळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मा. आर. आर. पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी तिसरे सह दिवाणी न्यायााधीश एन. सी. सोरते मॅडम, सहाय्यक अधीक्षक एम. एम. पुणेकर, वरिष्ठ लिपीक उदय पाध्ये यांनी पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन आर. बी. निकम (अधीक्षक) यांनी तर आभारप्रदर्शन जी. जी. भिसे (अधीक्षक ) यांनी केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.