टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजीभाऊ जाधव यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ. तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असताना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ. तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.