इंदिरानगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील इंदिरानगर वॉर्डात दि. १९ फेब्रुवारी २०२३ ला तथागत बौध्द समाज मंडळ इंदिरानगर व रमाई महिला मंडळ इंदिरानगर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आशिष घोनमोडे, शेषराव तुरे, सेवक पेटकर, प्रशांत मेश्राम, पंढरी भानारकर, सुरेश खोब्रागडे, सौ. सुविधा घोनमोडे, सौ. स्नेहा मेश्राम, सौ. शालू चांदेकर, सौ. वनिता मेश्राम, सौ. डोंगरे मॅडम, सौ. चौधरी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात तथागत बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित व प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी आशिष घोनमोडे, सम्बोधी खोब्रागडे, गच्छामी तुरे, जान्हवी वालदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला इंदिरानगर येथील बौध्द बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तथागत बौध्द समाज मंडळ व रमाई महिला मंडळ इंदिरानगरचे सदस्यांनी सहकार्य केले.