मातृ-संमेलन तथा हल्दी – कुमकुम कार्यक्रमाचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

33

– विश्व मांगल्य सभा तथा राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने केमिस्ट भवनात कार्यक्रम संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मातृ संमेलन तथा हल्दी कुमकुम या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी महिला भगिनींना केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजना संबंधी विस्तृत माहिती दिली.

राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्थेने हा जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय चांगला, कौतुकास्पद वाखण्याजोगे, स्तुतीमय कार्यक्रम घेतला. अशा मातृ संमेलन व हल्दी कुमकुम या कार्यक्रमामुळे स्त्री संघटनेला बळ येते. स्त्री संघटना मजबूत होते, मातृशक्तीची ताकद निर्माण होते. असे कार्यक्रम आयोजन करणे महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्थेने गडचिरोली जिल्ह्यामध्ये महिला करिता चांगले कार्य करीत आहे. कोरोणाच्या काळामध्ये सुद्धा या संस्थेने जनसेवेचे व्रत हाती घेत चांगले कार्य व उपक्रम घेत असल्याने या संस्थेने भविष्यात सुयश प्राप्त करत शुभाशीर्वाद व शुभेच्छा देत राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्थेनी केलेले जनसेवेचे व्रत निरंतर चालू राहो, अशी आशा व्यक्त करतो, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मॉ. जिजाऊ राजमाताच्या प्रतिमेचे पूजन करताना खासदार नेते यांचे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता मॉ. साहेब जिजाऊ यांना शतशः नमन करतो, असे उद्गार काढले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखाताई डोळस व सूत्रसंचालन प्रकाशजी गेडाम यांनी केले. राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्था गडचिरोली या संस्थेचे अध्यक्षा रेखाताई डोळस यांनी संस्थेबद्दल प्रस्ताविक विचार मांडताना महिला आणि मुलींच्या विकासासाठी संसाधने प्रदान करणे, महिला आणि मुलींना जीवन संसाधने आणि जीवनमूल्ये प्रदान करण्यासाठी जीवन विकास कार्यक्रम आयोजित करणे, राष्ट्रीय पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, नैतिक संहिता, दैवी ज्ञान आणि आधुनिक शिक्षणाद्वारे भारी कामगारांना पर्याय म्हणून भारताच्या विकासासाठी जनजागृती करणे,
विविध कार्यशाळा, व्याख्याने, प्रशिक्षण वर्ग आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन या संस्थेमार्फत केले जाते, असे आपल्या प्रास्ताविकामध्ये रेखाताई डोळस यांनी केले.

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा, सौ. शुभांगीताई मेंढे दक्षिण भारत संयोजिका, तेजस्विनीताई जोशी विदर्भ प्रांत महिला आघाडीच्या नेत्या, मृणालीताई वाघमारे महिला आघाडी नेत्या, प्रकाशजी गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस एस. टी. मोर्चा, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी तथा रा.जि.म.बहु.संस्था अध्यक्षा, आशिषभाऊ पिपरे नगरसेवक, वर्षाताई शेडमाके, सुंदराताई करकाडे, वच्छलाताई मुनघाटे, प्रदेश संपर्क प्रमुख विलास पा. भांडेकर, विजय कुमरे ता. महामंत्री, तसेच अनेक महिला कार्यकर्त्या पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.