आज कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व स्नेहमिलन सोहळा

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुणबी समाज सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व स्नेहमिलन सोहळा आज गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी कुणबी समाज भवन नियोजित जागा कारमेल हायस्कूल मागे शिवमंदिर रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळा कार्यक्रमात सकाळी ९ वाजता समाज बांधवांचे एकत्रीकरण, सकाळी १० वाजता पालखी सोहळा, ११.३० वाजता अल्पोपहार, दुपारी १२.३० मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, दुपारी १ वाजता महिलांकरिता विविध कार्यक्रम, ३ वाजता प्रबोधनपर कार्यक्रम, ४ वाजता भजनसंध्या, सायंकाळी ५.३० कीर्तनाचा कार्यक्रम व सायंकाळी ६.३० वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.