भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने व एकजुटीने संघटन मजबूत करावे : खा. अशोक नेते

51

– डेटा व्यवस्थापन, उपयोगिता जिल्हा कार्यसमिती बैठक व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा समर्पित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचार बैठकीचेे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २१ जानेवारी २०२३ : या महत्वाच्या बैठकी निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शक करताना भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक धोरण मजबुत करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक मताने एकजुटीने कार्य केले पाहिजे. यासाठी डेटा एन्ट्री, नमो ॲप तसेच ७०३०७७६१६१ या नंबर वरून फ्रेंड्स ऑफ बीजेपी व सरल ॲप च्या माध्यमातून संघटन व संघटना मजबूत करणे महत्वाचे आहे.तसेच परीक्षे पे चर्चा या द्वारे चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त या स्पर्धेला सहभागी व्हावे, असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

तसेच पुढे बोलताना भारतीय जनता पार्टी, शिवसेना (बाळा साहेबांची) आर. पी. आय. आठवले समर्पित उमेदवार नागो पुंडलीक गाणार यांच्या शिक्षक मतदार संघाच्या प्रचारार्थ या बैठकि निमिताने गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी संवाद साधत शिक्षक मतदार संघात संपुर्ण कार्यकर्ते यांनी एकमताने, ताकदीने एकजुटीने हि निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी संकल्प करुन विजय होईल याकरिता कार्यकर्ते बंधूंनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी मोहनजी मते आमदार तथा शिक्षक संघाचे प्रमुख यांनी बोलताना पदाधिकारी व कार्यकर्ते एकमताने संघटन मजबूत करून कार्य केल्यास शिक्षक मतदार संघाची निवडणूक आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास व्यक्त करत उपस्थित बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी व युवा वर्गाने खासदार अशोकजी नेते, आमदार मोहनजी मते, तसेच पदाधिकारी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीची सुरुवात सर्वप्रथम डॉ. शामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाल उपाध्याय तसेच भारतमाता या विभूत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या बैठकीला प्रस्ताविक जिल्हा संघटन महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार यांनी केले. तर संचालन जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे यांनी केले. या बैठकीचे सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, आमदार दक्षिण नागपुर तथा शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख मोहनजी मते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा प्रदेश सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, संघटन सरचिटणीस भाजपा एस. टी. मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, अल्पसंख्यांंक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, तसेच जिल्हा कार्यकारणी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.