गडचिरोली ते भानुप्रतापपूर (छ.ग.) नवीन रेल्वे मार्ग सर्वेसाठी मंजूर

70

– गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २१ जानेवारी २०२३ : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्तीसगड राज्याला रेल्वे लाईनने जोडण्याची नितांत आवश्यकता होती. ही आवश्यकता आता पूर्ण होणार आहे. दळणवळनाच्या दृष्टीकोनातून व व्यापारपेठच्या दृष्टीकोनातून या रेल्वे लाईनला फार महत्व आहे. कारण छत्तीसगड राज्यातील येथील अनेक व्यावसायिक गडचिरोली येथे व्यवसाय करण्यास इच्छुक आहे व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक छत्तीसगड राज्यात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे मध्यप्रदेश छत्तीसगड आणि यामध्ये व्यापारपेठ अधिक दृढ होणार आहे व दळणवळण वाढणार आहे.
आधीच गडचिरोली ते सिरोंचा रेल्वे लाईन मंजूर झाली आहे. सदर पुढील आवश्यक प्रशासकीय कार्य केंद्र व राज्य सरकार द्वारे संयुक्तपणे सुरू आहेत. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर झाले आहे. सदर रेल्वे लाईनकरिता जमिनीचे अधिग्रहण युद्धस्तरावर सुरू आहेत व विशेष म्हणजे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने प्रामुख्याने नुकताच गडचिरोली ते भानुप्रतापपूर नवीन रेल्वे लाईनसाठी सर्वे मंजूर झाल्याबद्दल गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांचे गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.