नमाद महाविद्यालयात उद्योजकता कौशल्यावर कार्यशाळा

78

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य आणि कल्पनांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात उद्योजकता कौशल्य या विषयावर कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डिव्हाईन डिलाईट बेकरीचे संस्थापक प्रतीक लालवानी, विशेष अतिथी म्हणून वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अर्चना जैन उपस्थित होते. प्रतीक लालवानी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आपला उद्योजकीय प्रवास उलगडून दाखवला. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि समर्पण ही यशस्वी उद्योजकाचे सूत्र असून उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या गुणांंचा विकास करावा, असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उद्योजकतेच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला. यावेळी अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यशाळेचे संचालन कृतिका वर्मा तर आभार दिया शरणागत यांनी मानले. यावेळी डॉ. खुशबू होतचंदानी, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. योगराजसिंग बैस, डॉ. अश्विनी दलाल, डॉ. रवींद्र मोहतुरे, डॉ. सरिता उदापूरकर, डॉ. भावेश जसानी उपस्थित होते. राधिका अग्रवाल, दीप अग्रवाल आणि ज्योती यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.